05/02/2026
*मन्सुरी पिंजारी समाज नाशिक तर्फे नीयाज ए गौस व समाज संघटन मेळावा आयोजित करण्यात आला.*
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 01/02/2026 वार रविवारी जलसा हॉल अशोका मार्ग नाशिक येथे मन्सुरी पिंजारी समाज नाशिक तर्फे नीयाज ए गौस व समाज संघटन मेळावा आयोजित करण्यात आला.हे या कार्यक्रमाचे 6वे वर्ष होते.
या प्रसंगी नाशिक जिल्हातून व उत्तर महाराष्ट्र तुन जवळपास 1500 समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमात गौश पाक नियाज ची फातीहा खानी झाली, व समाज संघटन साठी विशेष व्याख्यान ठेवण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून
*आरिफ अली मन्सुरी*
*(अध्यक्ष मन्सुरी - पिंजारी नद्दाफ समाज महाराष्ट्र राज्य)*
*श्री.संजय आप्पा चव्हाण (माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक नाशिक)*
*सलीम मामा शेख (माजी.स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक नाशिक)*
*सौ.रुपाली यशवंत निकुळे (नगरसेविका नाशिक)*
*श्री.यशवंत निकुळे*
*( सामाजिक कार्यकर्ते)*
*सौ. मंगला प्रकाश नन्नावरे*
*(नगरसेविका नाशिक)*
*श्री.प्रकाश नन्नावरे*
*(सामाजिक कार्यकर्ते)*
*अमायरा बब्बू शेख*
*(नगरसेविका नाशिक)*
*तौसिफ हारून मन्सुरी*
*(नगरसेवक पिंपळगाव नाशिक)*
*पप्पूभाई शेख*
*(युवानेते मुस्लिम समाज संघटक नाशिक)*
*हाजी.शब्बीर समशेर मन्सुरी*
*(नगरसेवक धुळे)*
*सिकंदर नद्दाफ भिवंडी, अकबर मन्सुरी सर मुंबई,*
*माजीद मन्सुरी (मालेगाव तालुका अध्यक्ष)*,
*जावेद मन्सुरी सर मालेगांव,*
*मोहम्मद सिद्दीकी साहब मुंबई*
*फरहान आरिफ मन्सुरी (महाराष्ट्र केसरी पद धुळे)*
असे अनेक सामाजिक राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
असे कार्यक्रम व विद्यार्थी गुण गौरव, व सामाजिक व इतर प्रोग्राम मन्सुरी पिंजारी समाज नाशिक टीम तर्फे दरवर्षी होत असतात .
या कार्यक्रमात सुत्र संचालन *फारुख पिंजारी* यांनी केले
बरेच मान्यवरांच्या भाषणात समाजासाठी संघटन व शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले तसेच मान्यवरांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मन्सुरी पिंजारी समाजाचे जिल्हा अध्यक्ष *ऐनोद्दीन मन्सुरी यांच्यासह खलिल मन्सुरी, रशीद पिंजारी, फारुख मन्सुरी, अँड. वसीम मन्सुरी, हाजी अस्लम मन्सुरी, रमजान पिंजारी,शरीफ शेख, आरिफ दस्तगीर, सरदार पिंजारी,अलाउद्दीन पिंजारी, शकील सत्तार मन्सुरी,इरफान मन्सुरी,आरिफ आयूब मन्सुरी, जाकीर मन्सुरी,रफिक मन्सुरी,अशपाक पिंजारी, इस्माईल पिंजारी,तनवीर मन्सुरी, आतिक मन्सुरी*
आदींनी अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
व आलेल्या सर्व
समाज बांधवांनी भोजन केले.
शेवटी आलेल्या सर्व मान्यवरांचे, व समाज बांधवांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.