09/08/2021
2 वर्षांपूर्वी याच दिवशी एक बीज रुजत घातल होत. आज त्याच रोपटं तयार झालंय. त्या रोपट्याला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाचे खतपाणी मिळून, एक दिवस त्या रोपट्याच एका अवाढव्य वृक्षात रूपांतर होईल आणि त्याच्या शीतल छायेत आपल्या सर्वांना सामावून घेईल हे नक्कीच. आपणा सर्वांचा आम्हाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग लाभला. आम्ही दिवसेंदिवस एक एक पायरी चढत आहोत. त्या प्रत्येक पायरीवर आम्ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादानेच पुढे जात आहोत. आपले आशीर्वाद असेच सैदैव पाठीशी राहोत हीच अपेक्षा.
धन्यवाद!🙏🙏
टीम कोकण ॲग्रो.