03/10/2022
काल प्रभागातील विविध दुर्गोत्सव मंडळाला भेटी दिल्या, नवरात्री उत्सवाच्या भक्तीमय सागरात न्हाऊन निघालेल्या सर्वांना माता दुर्गोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या,
परवा मी जेष्ठ नागरिक दिनानिमित्त परिसरातील जेष्ठ नागरिकांना गुलाब पुष्प देऊन व मिठाई भरवून हा दिवस साजरा केला होता,काल आमच्या भगीनी सौ.स्वातीताई जायले व सौ.राधाताई ठाकरे यांनी दादा आमच्या मंडळातील जेष्ठ महिला सदस्यांना पण आपण शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती केली तेव्हा आपण विनंती करू नका ही संधी मला मिळत आहे हे माझे मी भाग्य समजतो असे सांगून उपस्थित सर्व जेष्ठ मातांना नमस्कार करून त्यांना पुष्प व मिठाई भरवून त्यांचे आशिर्वाद घेतले,आपण करीत असलेल्या सामाजिक कामांची दखल व मुल्यमापन नागरिक करतात याचे समाधान वाटते.