03/07/2023
अहमदनगरकारणांसाठी शुक्रवारी भक्तीमय नजराणा "मोगरा फुलाला"
अहमदनगर : जुलै महिन्यात श्रावण महिन्याची चाहूल लागली असून सगळे वातावरण भक्तीमय झाले आहे. आपल्या देवाची भक्ती मध्ये विलीन होताना एक वेगळा अनुभव नगरकरांना देण्यासाठी *प्रबोधन परिवार* व *एस पी ल इन्फ्रा* घेऊन आले आहे प्रसिद्ध व्याख्याते मा. गणेश शिंदे आणि प्रसिद्ध गायिका मा. सन्मिता शिंदे यांच्या अनोख्या शैलीतून "मोगरा फुलला". हा भक्तीमय कार्यक्रम शुक्रवार दिनांक ७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता माउली सभागृह येथे होणार असून संतांची शिकवण आपल्या आयुष्यात किती महत्वाची असते ते या कार्यक्रमात प्रसिद्ध व्यख्याते मा. गणेश शिंदे उदाहरणासह या कार्यक्रमात मांडणार असून सुरेल भक्तिगीतांची मैफिलीचा नजराणा प्रसिद्ध गायिका मा. सन्मिता शिंदे नगरकरांना देणार आहे. हा कार्यक्रम झी टॉकीस या चॅनल वर संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असून नगरकरांसाठी हि पर्वणी एस पी ल इन्फ्रा यांच्या मार्फत आयोजित केला आहे. नगरकरांसाठी हा कार्यक्रम मोफत असून येताना सन्माणिका आवश्यक आहे. नगरकरांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आणि सन्माणिका मिळविण्यासाठी ८८८८८८६४४१ व ७९७२६२९८९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.